मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वादात आता राष्ट्र्वादीने उडी घेऊन भाजपाला ललकारले आहे. सत्तेचा कितीही दुरुपयोग करा. परंतु भाजपच्या पोकळ धमक्यांना महाराष्ट्रातील कुठलाही नेता घाबरत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला सुनावले आहे. ते आज मुंबई पत्रकार माध्यमंही बोलताना बोलत होते.
तसेच आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात आलेल्या कारवाईवर बोलताना मलिक म्हणाले की, सूडबुद्धीची एकदा व्याख्या समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आमच्याविरोधात सूडाने कारवाई होत आहे. सूडाने कारवाया करायला आमच्या हातात सीबीआय ईडी नाही. या देशात कुठे आणि काय सूडाने कारवाया होतात या संदर्भात आम्हाला बोलायला लावू नका.
पुढे बोलताना ते म्हणाले की, अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक आणि देशातील अनेक लोकं यांच्याविरोधात ज्या कारवाया सुरू आहेत. त्याला सूडाच्या कारवाया म्हणतात. तुमच्याकडे तपास यंत्रणा आहेत म्हणून तुम्ही सूडाच्या कारवाया करता आणि त्या सूडाच्या कारवायांना कायदेशीर कारवाया म्हणता. महाराष्ट्र धमकीबद्दल कारवाई झाली तर ती सूडाची कारवाई? ती सूडाची असेल तर बिनबूडाची असेल. कारवाई कायदेशीर असते. जर कायदेशीर कारवाई नसेल तर ती न्यायालयात टिकत नाही. अजूनही या देशातील न्यायालये काही प्रमाणात स्वतंत्र आहेत. आणि न्यायबुद्धी स्वतंत्र बाण्याने अजूनही न्यायदान करत असते, असंही राऊत म्हणाले.