कर्नाटक | भाजपचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सोमवारी राजीनामा दिला त्यानंतर आता कर्नाटकात मोठी खळबळ उडाली होती. येडियुरप्पां यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला. त्यानंतर त्यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजुर देखील केला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता कर्नाटकच्या जनतेमध्ये आक्रोश पहायला मिळत आहे. त्यातच आता एका येडियुरप्पा समर्थकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक ठिकाणी या निर्णयाचा निषेध केला जात आहे. तर चामराजनगर जिल्ह्यातील बोम्मलपूर गावात राहणाऱ्या एका येडियुरप्पा समर्थकाने आत्महत्या केली आहे. रवि उर्फ रचप्पा असं या समर्थकाचं नाव आहे. तो एका चहाच्या टपरीवर काम करत होता. तर तो येेडियुरप्पा यांचा कट्टर समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे.
समर्थकाच्या आत्महत्येनंतर पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे पोलिस याप्रकरणाचा आणखी तपास करत आहे. रचप्पावर कर्ज असल्याचं देखील सांगितलं जात आहे. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर तो चिंतेत देखील होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.