ठाणे | गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये अर्थात शिवतीर्थावर जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत घणाघाती टीका केली ताईच शरद पवारवार सुद्धा टीकेचे बाण सोडले.
तसेच यावेळी त्यांनी राज्यातील मदरशांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका केली. दरम्यान, आव्हाडांच्या टीकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अविनाश जाधव म्हणाले की,’जितेंद्र आव्हाडांना १९९९ नंतरचा इतिहास नीट माहिती नसेल तर त्यांना फक्त ठाण्यातला इतिहास सांगतो. ठाण्यात दोन मोठ्या दंगली मी त्यांच्यासमोर आणून देतो २००७-०८ ला राबोडीमध्ये झालेली आणि दुसरी भिवंडीमध्ये झालेली दंगल. यामध्ये आपल्या दोन पोलीसांना प्राण गमावावे लागले होते. आज त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल? याबद्दल आव्हाडांना कधी पुळका आला नाही.’ तसेच आव्हाडांना मशीद, भोंगा याबद्दल बोलल्यावर पुळका येतो, असेही जाधव म्हणाले.