मुंबई | सुशांत सिंह राजपूत याने आजच्या दिवशी १४ जून २०२० रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते. त्याच्या मृत्यूनंतर आद्यपही त्यांच्या आत्महत्येचा छडा लावण्यात केंद्रीय सुरक्षा दलाला यश आलेले नाही. याच पार्श्वभूमीवर त्याची प्रियसी रिया चक्रवर्ती हिने एक पोस्ट शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक’ अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
रिया चक्रवर्तीने तिचा आणि सुशांतचा फोटो शेअर करत इंस्टाग्रामवर लिहिले की, एक क्षणदेखील असे वाटले नाही की आता तू नाही आहेस, लोक म्हणतात की वेळ सर्व काही ठीक करतो, माझ्यासाठी तुझ माझा वेळ माझे सर्व काही होतास. मला माहित आहे की वरून तू मला पाहत आहेस, चंद्रावरून तू मला तुझ्या दुर्बीणीतून पाहत आहेस आणि माझी रक्षा करत आहेस. मी दररोज तू मला घ्यायला येशील म्हणून वाट पाहत असते. मी तुला सगळीकडे शोधत असते.
मी दररोज कोलमडून जाते मग मला तू सांगितलेली गोष्ट आठवतो. तुला मला सांगायचास की, तुझ्याकडे हा बेबू आहे आणि मग मी स्वतःला पुढील दिवसासाठी तयार करायचे. जेव्हा मला वाटते की तू इथे नाही आहेस, तेव्हा भावनांचे एक बंधन माझे शरीराला पार करतो. हे सर्व लिहिताना माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. रिया म्हणाली की, तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. तू माझे जीवन तुझ्यासोबत घेऊन गेला आहेस. ती पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरून निघू शकत नाही. मी तुझ्याशिवाय आजही एकटी उभी आहे. माझा प्रिय सनशाईन, मी आजही तुला दररोज मालपुआ खाऊ घालण्याचे वचन देते आणि फिजिक्सचे पुस्तक वाचते. माझ्याकडे परत ये. मला तुझी खूप आठवण येते माझा मित्र, माझे प्रेम बेबू आणि पुटपुट नेहमीसाठी…मनापासून अशी पोस्ट तिने उन्स्टग्रामवर शेअर केली आहे.