मुंबई | राज्याच्या विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शीतयुद्ध रंगले होते, या गोंधवरूनच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात विरोधी पक्षाचे १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. १ वर्षासाठी हे निलंबन असणार आहे.
यातच महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला.याच पार्श्वभूमीवर चाकणकरांनी राणा पती-पत्नीवर ट्विट केलं आहे. तसेच या तिवंतमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या वैद्य जात प्रमाणत्राच्या मुद्द्यावरून दोघं पती-पत्नीला टोला लगावला होता.
त्यांनी ट्विट केले आहे की,’ बायको जात चोरते आणि नवरा राजदंड , हे तर बंटी-बबली निघाले #अधिवेशन ‘ असं म्हणत जहरी टीका केली आहे. दरम्यान, नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलंय तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला. यावरून आता मविआ नेत्यांकडून सोशलवर त्यांच्यावर टिका करण्यात येत आहे.