(पुणे प्रतिनिधी) आघाडीचे नेते ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्यावर निर्बंध का नाहीत असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते आज पुणे येथे बोलत होते. तसेच ते म्हणाले की, चर्चेपासून पळ काढण्यासाठीच अधिवेशन आल्यानंतर कोरोना आठवतो असाही आरोप त्यांनी केला आहे.
पुण्यामध्ये आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘ युवा वॉरियर’ या भाजपा युवा मोर्चाच्या नव्या उपक्रमाला सुरुवात झाली. यापूर्वी पाटील माध्यमांशी बोलत होते. १८ ते २५ वयोगटातील युवकांना भाजपाच्या राजकारणाकडे आकर्षित करण्यासाठी युवा वॉरियर्स विंग सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमापूर्वी पाटील माध्यमांशी बोलत होते.
पाटील म्हणाले, उद्या शरद पवार,संजय राऊत वशाट उत्सवाला येता आहेत तिथे संख्येवर निर्बंध नाहीत. महाविकास आघाडी अनेक ठिकाणी आंदोलन करतं आहे तिथं निर्बंध नाहीत मग शिवजयंती वर निर्बंध का ? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी विचारला.