शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्हाला बाळासाहेबांनी हे घाणेरडं काम कधीच शिकवलं नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर चढवला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या मुद्यावरून शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांच्यावर टीका केली होती, त्यावर आता संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो. शाहिस्ते खानाची बोटं समोरून तोडली आहेत.
तसेच शिवसेना पाठीमागून वार करत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम कधी शिकवलं नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही, असं सांगतानाच पाठीत खंजीर आमच्या खुपसलेला आहे. शब्द आम्ही नाही फिरवला नाही. शब्द तुम्ही फिरवला आहे’, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.