मुंबई | एमपीएससी परीक्षा पस होऊन सुद्धा नियुक्ती न मिळाल्यामुळे नैर्याश्यग्रस्त स्वप्नील लोणकर यांचे आत्महत्या केली होती. यावरून लोणकर कुटुंबियांवर मोठा आघात झाला होता. शुक्रवारी लोणकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.
आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत… काळजी करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिवंगत स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. स्वप्नीलच्या बहिणीला शिक्षण व पात्रतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध करून देता यावी यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.
स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहीण यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची राज्य अतिथीगृह ‘सह्याद्री’ येथे भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नीलच्या आई सौ. छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईकपणे विचारपूसही केली. घटना दुर्दैवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर त्यांनी दिला. स्वप्नीलच्या बहिणीला रोजगारासाठी करता येईल ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणकर कुटुंबीयांना दिले.