मुंबई : अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओमध्ये आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी प्रकाशझोतात आलेले मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझेवर ATS ने अत्यंत गंभीर आरोप लावलेले आहेत. तसेच लवकरच ATS याबाबत जाहीर माहिती देण्याची शक्यता आहे.
ATS चे प्रमुख जयजीत सिंह यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेटही घेतली. यासंदर्भात सध्या ठाण्यात अनेक वेगवान घडामोडी सुरु आहे. या सगळ्यात मनसुख हिरेन आणि त्याचा भाऊ विनोद यांचे फोनवरील एक संभाषण समोर आले आहे.
२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांची होती. त्यानंतर २७ फेब्रुवारीला मनसुख हिरेन आणि त्यांच्या भावात फोनवरुन संभाषण झाले होते. या संभाषणाची रेकॉर्डिग ATS आणि NIA या संस्थांकडे उपलब्ध आहे. या सभाषांतून अनेक खुलासे समोर येत आहे.
राज्य दहशतवादीविरोधी पथकाने सोमवारी साडेतीन तास मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली. त्यांच्या घरातून NIA ने काही कागदपत्रेही ताब्यात घेतली. याशिवाय, एटीएसने आरोपी विनायक शिंदे याला सचिन वाझे यांचे निवासस्थान आणि रेती बंदरच्या परिसरात नेले होते. क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी आरोपीला या दोन्ही ठिकाणी नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.