मुंबई : विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला भीषण आग लागली. या आगीत १३ जणांचा रुग्णालयाच्या निष्कयाजीपणामुळे निष्पाप रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सएसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेवरून राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ताशोरे ओढले आहे.
विरार येथील कोरोना हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आणि त्यात झालेले दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. एकीकडे राज्यातील लोकांच्या मनात कोरोनाचे प्रचंड भय आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या घटनांमुळे अधिक भर पडत असल्याचे मत फडणवीसांनीं मांडलेले आहे. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि प्रशासन प्रत्येक घटनेनंतर आम्ही याची चौकशी करू असे सांगतात आणि दरवेळी सांगितले जाते की हॉस्पिटलचे फायर ऑडिट करू, पण असे ऑडिट होताना कुठेच दिसत नाही असा टोला यांनी लगावला होता.
भंडारा, इशान्य मुंबई, नाशिक, विरार या सगळ्या घटना अतिशय भयानक आहेत. मृत्यूमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. तेथील रुग्णांची योग्य ती काळजी घेण्याची व्यवस्था सरकारने करावी आणि या घटनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा. अशा घटना पुन्हा होणार नाहीत, याकरिता काही प्रभावी ठोस पावले सरकारच्या वतीने उचलली गेली पाहिजेत, अशी माझी सरकारला विनंती असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.
तर यावर मत व्यक्त करताना भाजप नेते किरीर सोमय्या म्हणाले की, कधी ऑक्सिजन तर कधी आग, ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकारची तसेच लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोविड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावे. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.