राजापूर | आजवर केंद्र सरकार किंवा राज्य सरकार एखादा प्रकल्प राबवता संबंधीत प्रकल्पग्रस्तांवर कोणताही अन्याय होणार नाही याचा विचार प्रथम करत असते मात्र स्थानिक पुढारी स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर कानाडोळा करून आपले हितसंबंध जपताना अनेकवेळा दिसून आले आहेत. असाच काहीसा प्रकार आता मौजे कार्डिजा, तालुका राजापूर येथे बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे होताना दिसून येत आहे. शासन नियमांप्रमाने ५० टक्के धरणग्रस्तांचे पुर्नवसन झाल्यानंतर धरणाचे काम सुरू करावयाचे असते असा नियम असताना मात्र येथे धरणग्रस्त लोकांना केराची टोपली दाखवून त्यांना वाऱ्यावर सोडून काँट्रॅक्टरने धरणाचे काम सुरु केले आहे.

निमाप्रमाणे धरणाचे काम सुरु करण्यापूर्वी धरणग्रस्तांना कुठे स्थलांतरित करणार आणि किती वेळात करणार या संदर्भातील कोणतीही माहिती त्यांना दिलेली नाहीये. आज त्याच परिसरात १२ धरणे व ३ पाटबंधारे असून सुद्धा त्या धरणाची दुरावस्था झाली आहे. तसेच परिसरात असलेल्या अरुणा धरणाची तर दुरावस्था झाली आहे. तसेच जामदा प्रकल्प हा संवेदनशील झोनमध्ये असल्यामुळे येथे कोणतेही मोठे प्रकल्प होऊ शकत नाहीये असा न्यायालयाचा नियम आहे मात्र तरीही या नियमांना डावलून या प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे.
म्हणूनच वर मंडालेल्या विविध मुद्द्यांमुळे भविष्यात जामदा प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांची सुद्धा हीच अवस्था होऊन भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकते. हाच मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेने मैदानात उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी साक्ली १०:०० वाजता जामदा प्रकल्प विरोधात भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्च्याचे नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्मान टेलिकॉम सेना अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपाध्यक्ष मा. श्री. सतीश रत्नाकर नारकर करणार आहे. तसेच या मोर्च्यामध्ये ग्रामस्थांनी मोठ्या संख्याने सामील व्हावे असे आव्हान सतीश नारकर यांनी केले आहे.
सदर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग (राजापूर) ते प्रांत अधिकारी कार्यालय (राजापूर) येथे धडकणार असून या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारून या ग्रामस्थांच्या मागण्यासंबंधी पत्र सुद्धा देण्यात येणार आहे.