मुंबई | मराठा आणि OBC आरक्षणाचा मुद्धा चांगलाच तापत असून सत्तधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरु झाले आहेत. त्यात आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात मागच्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु झाले आहेत. त्यातच या वादात भाजप आमदार राम सातपुते यांनी उडी घेतली असून वडेट्टीवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा, अशी घणाघाती टीका राम सातपुते यांनी केली. एका बापाची ओलाद असेल तर माझ्याविरोधातील आरोप सिद्ध करून दाखवा, असं आव्हान विजय वडेट्टीवार यांनी पडळकरांना दिलं होतं. त्यानंतर विजय वडेट्टीवार हे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आहेत. काय भाषा, काय विचार? विजय वडेट्टीवार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन हातभट्टीचा धंदा टाकावा, अशी घणाघाती टीका आता आमदार राम सातपुते यांनी केली आहे.
प्रकरण असे की, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर छत्तीसगड येथे दारूची फॅक्टरी असल्याचा आरोप केला होता. आपल्या स्वकियांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देऊन चंद्रपुरातील दारूबंदी उठवली, असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे. त्यानंतर वडेट्टीवार यांनी पडळकरांना चोख प्रत्युत्तर देत त्यांच्या वर अब्रुनुकसानीचा दावा ठोठावण्याचा निर्णय घेतला.