मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र सोशल मीडियावरून जाहीर केले होते. मनसे सैनिकांना पत्राद्वारे राज ठाकरे यांनी नवे आदेश दिले होते. भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यामुळे माझं पत्र घराघरात पोहोचवा, पत्राद्वारे घराघरात पोहोचा, त्याशिवाय आपले आंदोलन यशस्वी होणार नाही, असे पत्र राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना लिहिले होते. आज हे पत्र मनसेच्या कार्यकर्त्यांकडून घरोघरी पोहचवण्यात येत होते, मात्र मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र प्रसिद्ध केलं होतं. हे पत्र घरोघरी वाटण्याचा आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं होतं. मुंबईतही पत्रक वाटताना पोलिसांनी काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या कारवाईवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत देशपांडे म्हणाले, “पोलिसांची ज्या पद्धतीचे मनमानी दादागिरी व हुकूमशाही चाललेली आहे ती निषेधार्ह आहे.
तसेच पत्रके वाटणे चुकीचे आहे का ? शिवसेनेच्या लोकांनी काही केलं तरी चालतं. वरून सरदेसाई यांनी पोलिसांना शिव्या घातल्या तरी चालतात. आम्ही पत्रक वाटलं तर आम्हाला ताब्यात घेतल. हुकूमशाही लागली आहे का? शिवसेनेचं राज्य म्हणजे काय तालिबानी राज्य आहे का?” पुढे दिली सय्यदवर विचारले असताना देशपांडे म्हणाले की, “काही लोकांबद्दल न बोललेलेच चांगलं. चिखलामध्ये दगड मारला तर आपल्या अंगावर चिखल उडतो हे आम्हाला लहानपणी शिकवलं, त्यामुळे आम्ही कधी चिखलात दगड मारण्याचा प्रयत्न करत नाही.