राज्यात शिवसेना पक्षाने भारतीय जनता पक्षाला दूर सारून राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर हात मिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र तीन पक्षाची विचारसरणी आणि ध्येय धोरणे विभिन्न असल्याकारणामुळे अनेकदा वाद झालेले पाहायला मिळाले होते. त्यात आता काँग्रेस आमदाराने थेट लसीच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षाविरोधात आवाज उठवून आव्हान दिले आहे.
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी गुरुवारी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले आहेत. ‘शिवसेनेकडून वांद्रे पूर्व येथे आयोजित भव्य लसीकरण महोत्सवात तुमचं स्वागत. याठिकाणी लसींपेक्षांही जास्त बॅनर्स तुम्हाला दिसून येतील. येथील बॅनरवर महाविकास आघाडीचा उल्लेख कुठेच दिसत नाही. म्हणजे, इथं आणल्या जाणाऱ्या लसी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वखर्चातून पक्षनिधीतून आणल्या जात आहेत का? कृपया लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचा सोहळा करणं थांबवा, हे आपलं कर्तव्यच आहे असे म्हणत आमदार सिद्दीकी याने पोस्टरबाजी करणाऱ्या सेना नेत्यांना झापले आहे.
आमदार सिद्दीकीला यांनी लसीकरण केंद्राच्या उदघाटन प्रसंगी शिवसेना कार्यकर्ते करत असलेल्या गर्दीवरून चांगलीच टीका केली होती, ‘महाराष्ट्रात कलम १४४ लागू आहे. पण शिवसेना नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्ते लसीकरण केंद्रांच्या उद्घटनासाठी गर्दी करु शकतात. नियं फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत का? शिवसेनेला हे नियम लागू नाहीत का?, इथं एक व्यक्ती लस घेत असताना बारा जण फोटो काढतात,’ असं त्यांनी म्हटलं होतं.