ज्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दर कमी आहे तिथे ठाकरे सरकारने निर्बंधांमध्ये काही सूट दिली आहे. त्यानुसार आता हॉटेल, स्पा, जीम, सलून सगळं काही नियम आणि अटींनुसार सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी सरकारला विचहराला आहे.
ज्या भक्तांचे लसीकरण झालेले आहे अशा भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी राज्य शासनाकडे केली आहे.मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र आता सगळं काही सुरु झालेलं असताना, शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरं उघडण्याचा निर्णय देतीख सरकारने घ्यावा, अशी मागणी चार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
शासनाने विविध ठिकाणी निर्बंधामध्ये शिथीलता दिली आहे. त्यानुसार सगळं काही आता नियम अटींनुसार सुरु झालंय. मग आता मंदिरंही बंद नकोत. ज्यांनी ज्यांनी लस घेतली आहे, त्या भाविकांसाठी मंदिरं सुरु करा, अशी मागणी आचार्य तुषार भोसले यांनी केली.