मुंबई | सभागृहात गोंधळ घालणाऱ्या १२ आमदार्नचे निलंबन करणाऱ्या तालिका अध्यक्ष म्हणून कामगिरी बजावणाऱ्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहे. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष म्हणून सभागृहात कडक कामगिरी बजावली. जाधव यांनी भाजप आमदारांना हटकले असता त्यांच्या अंगावर धावून गेले. एवढंच नाहीतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाधव यांना शिवीगाळ सुद्धा केली. हा प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून भास्कर जाधव यांना धमकी दिल्या जात होत्या.
याबद्दल त्यांनी सभागृहात याची माहिती दिली. त्यानंतर भास्कर जाधव यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर आज भास्कर जाधव यांना सरकारने सुरक्षा पुरवली आहे. दोन सुरक्षारक्षक भास्कर जाधव यांना पुरवण्यात आले आहे. अधिवेशनाच्या काळात झालेल्या गोंधळानंतर सुरक्षा पुरवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. जाधव यांना धमकी देत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.त्यानंतर गृह खात्याने ही सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.