स्व. श्री अरुण जेटली जी एक महान राजकारणी, कायदे तज्ञ आणि भारताचे अर्थमंत्री होते. ते आमच्यासाठी गुरु समान होते. आम्हा सर्वांसाठी त्याच्यासोबत काम करणे हे सोभाग्य होतं. त्यांच्या नावाने आज या स्मारकाचे उद्घाटन करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. अरुण जेटली यांच्या स्मारकाच्या उद्घाटनानंतर केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन सभागृहात संबोधन केले.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते, श्री देवेंद्र फडणवीस, श्री अरुण जेटली जी यांचे स्मरण करताना म्हणाले की ते महान राजकारणी, कायदे तज्ञ आणि भारताचे अर्थमंत्री होते, ते देशासाठी पूर्णपणे समर्पित होते. त्यांनी नेहमी विरोधी पक्षाचा भ्रष्टाचार उघड केला, त्याचबरोबर वैयक्तिक संबंधही जपले. परंतु त्यांनी कामात राष्ट्राशी कधीही तडजोड केली नाही. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष होते.
मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार श्री मंगलप्रभात लोढा यांनी स्वागतपर भाषण केले आणि श्री अरुण जेटली जी यांचे स्मरण करताना ते म्हणाले की ते अतुलनीय प्रतिभेचे धनी होते. त्यांनी जीएसटी द्वारे संपूर्ण देशाला एका करा अंतर्गत आणले, त्याबद्दल संपूर्ण देश त्यांचा आभारी राहील. त्यांनी सुरू केलेल्या आर्थिक परिवर्तनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळाली आहे. त्याच्या प्रतिभा क्षमतेचे सामर्थ्य संपूर्ण देशाने मानले होते. त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील. श्री मंगलप्रभात लोढा यांनी या कार्यात सहकार्याबद्दल श्री शरद पवार यांचे आभार मानले.
फिल्म्स डिव्हिजन सभागृह, मुंबई येथे केलेल्या संबोधना च्या आधी केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी आज मुंबई के पेडर रोड़ स्थित जसलोक हॉस्पिटलच्या समोर, डॉक्टर निवास च्या जवळ स्व. अरूण जेटली यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्र विधान सभा विरोधी पक्ष नेते श्री देवेन्द्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष व विधायक श्री मंगलप्रभात लोढ़ा, वरिष्ठ खासदार श्री गोपाल शेट्टी, श्री प्रफुल पटेल, श्रीमती संगीता अरूण जेटली, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर सहित अनेक गणमान्य लोक उपस्थित होते.
हा कार्यक्रम लोढ़ा फाउंड़ेशन तसेच स्व. अरुण जेटली फाउंड़ेशनच्या सहयोगाने आयोजित केला होता. या वेळी विदेशी दूतावासाचे प्रतिनिधी, स्थानीय खासदार, आमदार, नगरसेवक याबरोबरच शहरातील अनेक गणमान्य लोग उपस्थित होते.