नवी दिल्ली | देशात इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सुरु केलेल्या आंदोलनावर विरोधकांना उत्तर देताना सीतारामन यांनी १६ ऑगस्ट रोजी विधान केलं की, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या भावाचे मुख्य कारण तेल रोखे (ऑइल बाँडस्) व त्यावरील व्याज मोदी सरकारला द्यावे लागत असल्याच त्यांनी बोलून दाखविले होते.
मात्र आता केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा हा दावा माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या माहितीनुसार खोटा सिद्ध झाला आहे. साकेत एस. गोखले यांनी माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तरात म्हटले आहे की, सरकारने आर्थिक वर्ष २०१५-२०१६ पासून तेल रोख्यांच्या मूळ किमतीचे कोणतेही भुगतान केलेले नाही. त्यामुले केंद्रीय मंत्री देशातील नागरिकांची फक्त फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्षांनी मंत्री निर्मला सीतारामन यांनी तेल रोख्यांबाबत केलेला युक्तिवाद आधीच खोडून काढलेला आहे. काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सीतारामन यांच्या दाव्यावर हल्ला करताना म्हटले की, खोटे बोलण्यासाठी सरकारमध्ये एक व्यक्ती पुरेशी आहे. अर्थमंत्र्यांनी आपली माहिती सुधारून घेतल्यास बरे. असा टोला लगावला आहे.