मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपांवरून विरोधकांनी जोरदार टीका ठाकरे सरकारवर केली होती.
त्यातच आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट शरद पवार शिवसेना संपवत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. राष्ट्र्वादीने मुख्यमंत्र्यांना राठोड यांचा राजीनामा घ्यायला लावला, तर सचिन वझे यांना निलंबित करण्यास भाग पाडले. उद्धवजी, शरद पवार हे शिवसेना संपवायला निघाले आहेत, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच्या दबावामुळे सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. राठोड यांच्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होते, मग धनंजय मुंडे यांच्यामुळे होत नाही का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव आणत आहे. असा आरोप पाटील यांनी राष्ट्रवादीवर लगावत सेनेला सावधान राहण्याचा इशारा दिला आहे.