तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता ,अविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक सुरु झालेली आहे. त्यात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये आहेत होते. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी तेथील स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधला होता.
यावेळी बोलता फडणवीस म्हणाले की, मी माझ्या विधानावर ठाम आहे, पण आता सध्या ही वेळ नाही.महाराष्ट्र संकटात आहे आधी आम्हाला जनतेसाठी उभे रहायचे आहे .या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढायचे आहे .राजकारण होत राहिल .मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल आपण कोरोनाशी लढत आहोत, आम्हाला कोरोनाशी लढायचं आहे, या सरकारशी लढायचं नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करून दाखवेल’, असा विश्वास भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे .
पुढे पंढरपूर पोट निवडणुकीत केलेल्या विधानावर बोलताना फडणवीस म्हणाले की, पंढरपूर पोटनिवडणुकीमध्ये अख्खी राष्ट्रवादी उतरली, संपूर्ण प्रशासनाचा गैरवापर करण्यात आला. पण जनतेनं आमच्या उमेदवाराला निवडणूक दिलं. मी पंढरपूरच्या जनतेला शब्द दिला होता या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी माझ्या विधानावर ठाम आहे, पण आता सध्या ही वेळ नाही. तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वदूर नुकसान झाले नाही. पण, काही ठिकाणी यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तिथे मदत करण्याची गरज आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी राज्य सरकारने जी मदत दिली होती. ती यावेळी अद्यापही दिली नाही असंही फडणवीस म्हणाले.