लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र भाजप आणि मनसेने या बंदला विरोध केल्याचं दिसून येतं आहे. तर दुसरीकडे या बंदचे राज्यभरात पडसाद दिसून आले आहेत याच मुद्द्यावरून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी मिसेस अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.
अमृता फडणवीस यांनी या संदर्भात त्यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत की, ‘कोणी मला सांगेल का?, आज वसूली चालू है या बंद?’ असा खोचक सवाल करत त्यांनी महाराष्ट्र बंदला आपला विरोध दर्शवला आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याच विषयावर भाष्य करत राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
चित्र वाघ यांनी यावेळी ‘राज्यातल्या धोरणांबाबत ढिम्म’ सरकार, दुसऱ्याच्या नावावर राजकारण साधायला पुढाकार’ असलेलं महाराष्ट्र सरकार. बलात्कार अत्याचार घटनांनी रोज महाराष्ट्र हादरून जातोय,अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय. महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो… #NoMaharashtraBandh असं म्हणत वाघ यांनी जोरदार निशाणा साधला आहे.