नवी दिल्ली | केरळच्या दोन मासेमारांना केरळच्या किनाऱ्याजवळ मारुन टाकल्याच्या प्रकरणावर सुरू असलेला खटला बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावरुनच आता काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्या मोदी सरकारवर टिक करण्याची एकही संधी काँग्रेस सोडताना दिसत नाही.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. खोटं बोलण्यासाठी मोदींना नोबेल मिळायला हवं, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये केरळच्या किनाऱ्याजवळ दोन मासेमारांना मारुन टाकल्याचा आरोप दोन इटालियन खलाशांवर होता. या प्रकरणाची सुनावणीही सुरू होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने भारतातील ही सुनावणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात आता इटलीच्या कायद्यानुसार त्याच देशामध्ये पुढील कारवाई होणार आहे.
पंतप्रधान होण्याआधी नरेंद्र मोदी यांनी ही कारवाई सौम्यप्रकारे चालली असल्याची टीका करत सोनिया गांधींवर जोरदार टीका केली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाजपा सरकारने मौन बाळगल्याप्रकरणी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी मोदींवर टीका केली आहे. दिग्विजय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. या निर्णयानंतर नरेंद्र मोदींचं एक जुनं ट्विट व्हायरल होत आहे.
एका युजरच्या ट्विटला उत्तर देत दिग्विजय सिंह यांनी “मी याबद्दल सहमत आहे, खोटं बोलण्याच्या बाबतीत मोदींना फक्त नोबेलच मिळणार नाही, तर खोट्या लोकांची जर वर्ल्ड चॅम्पियनशीप असेल तर त्यात मोदींना प्रत्येकवेळी सुवर्णपदक मिळेल. त्यांना हरवणं अशक्य आहे असं म्हटलं आहे.