ड्रग्स प्रकरणी एनसीबीने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली असून याच मुद्दयावरून मागच्या काही दिवसातील राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच अलमी पदार्थाच्या मुद्यावरून संपूर्ण राजकारण फिरताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जे दारू पितात किंवा सिगारेट ओढतात त्यांना तुरूंगात पाठवले जात नाही, परंतु ज्यांच्याकडे अमली पदार्थांचे प्रमाण त्यांनी कितीही घेतले तरी त्यांना तुरूंगात टाकले जाते. या गोष्टी बदलण्याची गरज आहे आणि जे व्यसनी आहेत किंवा ड्रग्स वापरतात, त्यांना चांगल्या आरोग्य सेवेसाठी पुनर्वसन केंद्र किंवा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं पाहिजे असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील अमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवन करत असल्याचा मुद्धा समोर आला. आर्यन खानवरील कारवाईत बिलकूल पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. सक्तवसूली संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच असल्याचंही रामदास आठवले म्हणाले.