उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार टक्कर देण्यासाठी विविध घोषणा आपल्या जाहीरनाम्यात केल्या आहेत. या या जाहीरनाम्यातून सत्तेवर आल्यास महिलांना नोकरीमध्ये 40 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा जाहीरनामा आज जाहीर केला. आम्ही आज निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. हा जाहीरनामा केवळ स्त्रियांचा जाहीरनामा ठरणार नाही. तर या घोषणापत्रामुळे सत्ता आणि प्रशासनातील महिलांच्या भागीदारीला इतर पक्षही गंभीरपणे घेतील ही अपेक्षा आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या आहे. त्यामुळे या जाहीरनाम्यात महिलांना प्रथम स्थान देण्यात आले आहे.
शक्ती, संकल्प, करुणा, दया आणि साहस हे महिलांचे गुण असतात. हेच गुण राजकारणातही यावेत ही आमची इच्छा आहे. आज केवळ महिलांबाबतची चर्चा केवळ कागदावरच असते. मात्र, काँग्रेसने महिलांना पंचायततीत 33 टक्के आरक्षण देऊन महिलांच्या सक्षमीकरणास सुरुवात केली होती. जेव्हा सत्तेत महिलांचा सहभागच नव्हता. त्याकाळात काँग्रेसने देशाला पहिली महिला पंतप्रधान दिली, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.