सांगली | संविधान दिवस व जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने सभासद नोंदणी प्रारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत असतांना काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक श्रीरंग चव्हाण यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. यावरी त्यांनी देशाला महागाईच्या खाईत लोटून, तसेच शेतकरी विरोधी धोरणे राबवून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारचा आगामी निवडणुकीत जनता कडेलोट करेल, असे प्रतिपादन केले.
चव्हाण म्हणाले की,’कॉँग्रेस ही एक विचारधारा आहे. देशाला कॉँग्रेसचे विचारच पुढे नेऊ शकतात. निवडणुकीत आघाडी केल्याने कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, तसेच पक्षाचेही नुकसान होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. कॉँग्रेसची विचारधाराच पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देईल. जे सध्या कॉँग्रेसमध्ये आहेत तेच खरे मावळे आहेत.’ तसेच शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कायदे रद्द करण्यात आले हे कॉँग्रेसचे यश आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सोपानराव म्हस्के, प्रदेश प्रतिनिधी डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस बाबूराव शिंदे, नरेश देसाई, ॲड. दत्तात्रय धनावडे, तालुकाध्यक्ष विक्रम तरडे, संदीप माने, प्रकाश परामणे, जिजाबा निकम, शिवाजीराव गायकवाड, अमृतराव शिंदे, तानाजी रांजणे, बाबासाहेब साळेकर, अजय नलावडे, संदीप गोळे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते.