पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी या प्रकरणात शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर एकचं खळबळ उडाली होती. त्यात आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यात मनसेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाला मनपाने परवानगी नाकारली होती याच मुद्द्यवरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राठोड यांचे नाव घेऊन मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
‘आम्ही मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम योग्य ती खबरदारी घेऊन पार पाडू. बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही’, असा खोचक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
वनमंत्री संजय राठोड २३ फेब्रुवारी रोजी वाशिममधील पोहरादेवी गडावर गेले होते. पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड समर्थकांनी तुफान गर्दी केली होती. तेंव्हा कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले होते.