माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करत घणाघाती टीका केली आहे. मत दिले नाही म्हणून मुळा साखर कारखाना’च्या माध्यमातून मत न दिलेल्या शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करायचा नाही अशी भूमिका मंत्री शंकरराव गडाख यांच्या साखर कारखान्याने घेतली होती.
गडाख यांच्या या निर्णयामुळे शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. शेतकऱ्यांना ऊस तोडू द्यायचा नाही, परिणामी त्याची नोंद होत नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज मिळणार नाही अशी शेतकऱ्यांची कोंडी करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लक्ष केले होते. तसेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी फडणवीसांनी केली होती.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणाऱ्या शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण आहे. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणाऱ्या पक्षांना लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?, असा सवाल फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.