पुणे | पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीबरोबर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे त्यातच खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे याच मुद्द्यावरून आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे.
आगामी निवडणुका सोप्या नाहीत हे विरोधकांना माहिती आहे. छोटे पवार कमी पडल्यामुळे मोठ्या पवारांना निवडणुकीत उतरावे लागले, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पटील यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, अगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या जागा वाढल्या पाहिजेत, त्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रकाश जावडेकर म्हणाले की, २०१९ ची विधानसभा निवडणूक आपण पराभूत नाही तर विजयी झालो. मात्र, शिवसेनेने गद्दारी केली आणि विरोधकांशी हातमिळवून केली.
तर जगदीश मुळीक म्हणाले की, या पुस्तकातून चंद्रकांत पाटील यांचा ४५ वर्षांचा संघर्ष उलघडतो. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले व्यक्तिमत्त्व आज राज्याचे प्रमुख आहेत, साधी राहणी आणि उच्च विचारणसणी हीच त्यांची ओळख आहे.