नवी दिल्ली | केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यविरोधात शेतकरी मागच्या अनेक महिन्यापासून आंदोलन करत असून काळ पंतप्रधान मोदी यांनी उत्तरप्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन कृषी कायदे रद्द करण्याची काल घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयाचे काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी स्वागत केले आहे.
केंद्र सरकारने आता लखीमपूर खीरी येथे भाजप नेत्याच्या गाडीखाली चिरडून ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय द्या, अशी मागणी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केली आहे. त्यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. त्यांनी म्हटले की, गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याने लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडल्याचा आरोप आहे. मात्र, भाजप सरकार आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोपींसोबत व्यासपीठावर एकत्र दिसले तर ते शेतकऱ्यांना चिरडणाऱ्यांना संरक्षण देत असल्याचा संदेश लोकांमध्ये लोकांमध्ये जाईल. पंतप्रधानांचा हा निर्णय ७०० हून अधिक शहीद शेतकऱ्यांचा अपमान असेल असेही प्रियंका यांनी म्हटले. पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे.