सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने अत्याचाराचे गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. भारतीय जनता पक्षाने तर मुंडे यांचा राजीनामा मागितला होता. पुढे रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेऊन मुंडे यांना जीवनदान दिले होते.
तसेच पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाशी संबंध असल्याचे आरोप शिवसेना नेते व माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात आले होते. पुढे त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता,
त्यात मनसुख हिरेन प्रकरणी पुढे आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव घेऊन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर घणाघाती आरोप लावले होते. या सर्व घडामोडीवर आता माजी खासदार निलेश राणे याने आघाडीच्या नेत्यावर जहरी टीका केली आहे.
निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले इतके विस्कटले आहेत की TV समोर येऊन तेच तेच बोलतायत. त्या धनंजय मुंडे ला विचारा शेण खाऊन कसं सटकायचं. हे राष्ट्रवादीवाले स्वतःला फार मोठे समजतात पण ह्यांची वाट एक महिला नाही तर एक पोलिसवाले लावून जातात,’ अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.