पुणे | महानगरपालिकेची परवानगी नसतानाही भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवरच भाजपा नेते आणि खासदार किरीट सोमय्याचा सत्कार केला. मी पुणे भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक याचे आभार मानतो व शाब्बासकी देतो. या उद्धव ठाकरेच्या गुंडांनी या महापालिकेच्या पायऱ्यांवर माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. होता.
पुढे मुख्यमंत्र्यांना चॅंलेंग करताना सोमय्या म्हणले की, त्या मुख्यमंत्री ठाकरेंना माझं चॅलेंज आहे. तुम्ही ज्या कोविड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं त्या कंपनीचा ,मालक कोण आहे ? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्याने नाव सांगाव , मी पुणेकरांना त्याचंनाव सांगतो आज, जी कोविड कंपनी जी कधी रजिस्टर झाली नाही त्याचा मालक एक चहावाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या लोकांच्या जीवाशी खेळलं आहे. त्यांचे मित्र संजय राऊत त्यांची बेनामी कंपनी आहे. 100 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट दिले. पुणे महानगरपालिकेने त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरेने मुंबई महानगरपालिकेचे चार कॉन्ट्रॅक्ट दिले. उद्धव ठाकरे व संजय राऊत त्यांच्या बेनामी कंपनीवर कारवाई झाल्या शिवाय किरीट सोमय्या गप्प बसणार नाही. असे मत सोमय्या यांनी व्यक्त केलं.
आज आपली शहरामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या उपस्थित झाले आह. याचा महापालिकेत त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. आज या लढवय्या नेत्याच्या स्वागत साठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. सगळ्याचं स्वागत करतो. भ्रष्टाचारा विरोधातील लढाईमध्ये किरीटजी सोबत खांद्याला खांदालावून उभे आहोत असे मत शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केलं