राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विविध मुद्द्यावरून भारतीय पूजनात पक्षाने महाविकास आघाडीवर आणि मुख्यतमरी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एनसीबीची कारवाई, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, आरक्षणाचा मुद्दा, निवडणुका या सर्व मुद्द्यांवरून भाजप नेते सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. अशातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारला धारेवर धरल आहे. गेल्या दोन वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय कारवाई केली याचा खुलासा करावा असं आव्हान राणे यांनी ठाकरे यांना दिलं आहे. गेल्या दोन वर्षात मराठा समाजाच्या विकासासाठी सरकारनं काहीच केलं नसल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.
मी आवर्जुन मराठा समाजाला सांगतो. गेली दोन वर्षात सरकारनं काय केलं आपल्यासाठी ते आठवा. सरकारला फक्त आर्यन खानची चिंता आहे. ना देशमुखांच्या पोरांची चिंता आहे. ना पाटलांच्या पोरांची चिंता या सरकारला आहे. परिणामी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं असं म्हणतानाच राणे यांनी लवकरच आम्हाला ५९ वा मराठा मोर्चा काढावा लागेलं, असं म्हटलं आहे.