राज्यात भोंग्याचे प्रकरण तापत असून आता पर्यंत मनसे विरुद्ध राज्य सरकार असा वाद निर्माण झाला आहे. ashtach सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सुमारे साडेचारशे मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरविण्याची करवाई करावी. अन्यथा पोलीस ठाण्यांसमोर हनुमान चालिसा म्हणत आंदोलन करून, असा पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.
याबाबतचे पत्र पक्षाचे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले आहे. शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह शहर पदाधिकाऱ्यांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत. या पत्रानुसार, “भोंगा हा समाजिक विषय आहे व आम्हालाही सामाजिक तेढ निर्माण करायची नाही.
मात्र, आम्ही आमच्या भूमिकेपासून फारकत घेऊ शकत नाही. त्यामुळे शहरात सुमारे 400 ते 450 मशिदी अस्तित्वात असून जवळपास सर्व बेकायदेशीरपणे मान्यता न घेता लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे ते तातडीने काढावेत अन्यथा कायमचे बंद करावेत. तसेच सामाजिक सलोखा राखण्यासाठी मौलवींशी चर्चा करून आम्हाला भोंग्यावरून अजान होणार नाही याचे लेखी आश्वासन द्यावे अशी मागणी पत्रात करण्यात आली.