मुंबई | महाराष्ट्र नवनिर्ण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला. यानंतर मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांनी अमोल मिटकरींना खडेबोल सुनावले आहेत. तसेच खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिली आहे.
मिटकरी यांना तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळालीय. हे गटर बंद ठेवा, अन्यथा मी ज्या विधानसभा मतदारसंघाचं काम करतो तेथून मंत्रालयात गाडी घेऊन जाताना गाडीच्या काचा फोडू, अशा इशारा जगदीश खांडेकर यांनी दिला आहे. तुम्ही गाडीच्या काचा काळ्या करुन जातात, आता जास्त काळ्या काचा करुन जा. नाहीतर दुसऱ्याची गाडी घेऊन या, नाहीतर महाराष्ट्र सैनिकाला गाडीत दिसला तर फोडून काढल्याशिवाय राहणार नाही.
पुढे बोलताना खांडेकर म्हणाले की, एखादा व्यक्ती राष्ट्रद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या कायद्याचं काम आहे. मग मिटकरी भारतीय संविधानापेक्षा मोठा झालाय का? राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढी मिटकरी यांची लायकी नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.