भाजप प्रवक्ते चित्रा वाघ हे सातत्याने महाविकास आघाडी व शिवसेना यांच्यावर टीका करत असतात. सरकारवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. सध्या मुंबईतील बेस्टच्या परिवहन आस्थापनामध्ये कंत्राटी कामगार यांचे आंदोलन सुरु आहे.गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी कामगार आंदोलन करत आहेत. आता याच मुद्द्यावर भाजप प्रवक्ते चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
बेस्टच्या कंत्राटी कामगारांना वेळेत वेतन मिळत नसल्यामुळे ते कंत्राटी कामगार आंदोलन करत आहेत. याच मुद्द्यावर आता चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून ट्वीट केले आहे. चित्रा वाघ म्हणतात की, बेस्टच्या कंत्राटी कामगारांना वेळेत वेतन मिळत नसल्यामुळे ते आंदोलन करत आहेत, मात्र बेस्ट मुख्यमंत्र्यांचे सरकार कंत्राटदारांविरुद्ध काहीही कारवाई करत नाही. टक्केवारी पोचली की तुम्हाला वेतन मिळो की न मिळो तुमचा पगार तुमची जबाबदार, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर थेट टक्केवारी घेण्याचे आरोप केल्याने, आता शिवसेना आणि चित्रा वाघ यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळणार अशी शक्यता आहे. आता चित्रा वाघ यांच्या टीकेला महाविकास आघाडी काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.
