कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटना केंद्र आणि राज्य सरकारविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला. या मोर्च्याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली असून राजू शेट्टी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावाने घोषणा देण्यात आल्या होत्या
ऐतिहासीक अशा दसरा चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली आहे. या मोर्चाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघनेचे कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटने प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी ( यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जात आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारही शेतकऱ्यांच्या हिताविरोधात काम करत आहे. त्याच्या निषेधार्थ विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आधीच वातावरण निर्मिती केली होती. जिल्ह्यात सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी दौरे करुन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्यामुळे या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थिती दर्शवली आहे.
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आता दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी राजू शेट्टी हे सक्रिय होते. इतकंच नाही तर ते महाविकास आघाडीचे सूचकही होते. मात्र, मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि राजू शेट्टी यांच्यात बिनसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.