सध्या संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम सर्वच राज्यात राबवली जात आहे. मात्र आज अनेक राज्यांमध्ये मोठया प्रमाणात लसीचा तुडवडा जाणवू लागला आहे. तसेच याच मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता याच मुद्द्यावर भाजपा नेत्याने लस काय झाडावर लागल्यात का ? असं अजब विधान केले आहे.
राजस्थानामध्येही लोक लसीकरणाला प्रतिसाद देत असल्यानं कोरोना लसींची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे आता लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वांरवार लसीकरण तुटवड्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राजस्थानला केंद्र सरकारने पुरेशा प्रमाणात लस दिल्या नसल्याचा आरोप गहलोत यांनी केला होता. त्यावर आता राजस्थान भाजपचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी गहलोत सरकारवर टीका केली आहे.
कोरोना प्रतिबंधक लस काही झाडाला लागलेल्या का? की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशोक गहलोत आणि गुलाबचंद कटारिया यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता कटारिया यांच्यावर सर्वजण टीका करताना दिसत आहे.