उजनीच्या पाणी प्रश्न आता चंगळच तापू लागला आहे. या प्रकरणी सोलापुरातील शेतकरी चंगळच अक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. त्यात सोलापुरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी दहन केले आह. तर बारामती येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर तो निर्णय जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे आणि शासन दरबारी तसा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूरसाठी पाणी पळवून नेले आहे. तो निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, भाजप आणि इतर संघटनांकडून आंदोलनं करण्यात आली होती. त्यानंतर जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे सांगितले असं प्रभाकर देशमुख म्हणाले.