सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या घरावर संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील वातावरण सध्याच्या घडीला बिघडल्याचे दिसून आले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप एकमेकांवर टीका करण्याची एक पण संधी सोडताना दिसत नाही. या घटनेवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पण त्यांचे मत व्यक्त केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर दगडाने हल्ला केला नाही, तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र माझ्या वाहनावर दगडाने हल्ला होऊन देखील माझ्यावरच गुन्हा दाखल केला गेला, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती शब्दांमध्ये टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी शरद पवारांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. कारण, तुम्ही 50 वर्ष त्या लोकांचं नेतृत्व केलं. विलिनीकरणाची आशा त्यांनी लावली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हे आरोप पडळकरांनी केले आहेत.