मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधला आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण आज आपण करत आहोत. देशाची एकंदरीत स्थिती अशी झाली आहे की, आज शिवसेनाप्रमुख हवेच होते असे जनतेला प्रकर्षाने वाटते असंही सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं आहे. … तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते सामनाच्या अग्रलेखात म्हटलं, महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्काम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते.
त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले. हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. ‘मातृभूमी’ला वंदन करणारा प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा, असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रूप दिले. त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर ‘लेक्चर’ देतात. तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते! शिवतीर्थावर बाळासाहेब विसावले आहेत, पण ते विसावणेही प्रेरणा देत आहे.
एक योद्धा शिवतीर्थावरुन बळ देत आहे, ते महायोद्धाच होते. लोकांना बाळासाहेबांची आठवण प्रकर्षाने होते अग्रलेखात पुढे म्हटलं, संकटाची वादळ घोंघावू लागले, राष्ट्राच्या छपरावरची कौले उडू लागली की, लोकांना बाळासाहेबांची आठवण प्रकर्षाने होते. बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर हल्ले झाले. हिंदू वस्त्या, मंदिरांची तोडफोड झाली.
त्यानिमित्ताने त्रिपुरा राज्यात तथाकथित हिंदू संख्यांकांनी आंदोलने केली. त्या आंदोलनांमुळे मुंबईतील कुमा एका रझा अकादमी नामक इस्लामी संखटनेच्या भावना दुखावल्या. या मौलवींनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्या बंदचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरात उमटले. हिंसाचार घडवण्यात आला. वाचा : कोरोना बाधित मोकाट अन् बोगस रुग्णावर होतायत उपचार, औरंगाबादमध्ये 10 हजारात मिळतायत डमी रुग्ण बाळासाहेब असते तर… रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे. हिंसाचार घडवणे, दगडफेक करण्याइतके बळ यांच्यापाशी नाही. तरीही त्रिपुरातील घटनेवरुन महाराष्ट्रात बंदची हाक देणे हा प्रकार योग्य नाहीच असं अग्रलेखात म्हंटल आहे.