वाझे आणि परमबीर सिंह या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आघाडी सरकारच्या अडचणी अधिक वाढवल्या होत्या. त्यात फडणवीस सतत पत्रकार परिषद घेऊन अक्षरशः ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडत आहे.
मात्र आता फडणवीसांच्या होणाऱ्या आरोपांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा उत्तर दिले आहे. त्यात आघाडीवर होत असलेल्या आरोपांवर पूर्वीचे भाजपा नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पत्रक काढून देवेंद्र फडणवीसांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे अनेक उदाहरणे दिले आहेत.
गोटे आपल्या पत्रकात म्हणतात की, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. सत्ता गेल्यापासून फडणवीस यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. फडणवीसांकडे आतापर्यंत केलेल्या एका तरी भ्रष्टाचाराच्या तक्रारीच्या प्रकरणाची चौकशी झाली का? असा प्रश्न थेट गोटे यांनी फडणवीसांना विचारला आहे. अनिल गोटे यांनी याबाबतचे पत्रक देवेंद्र फडणवीसांवर विविध आरोप केले आहेत.
पुढे बोलताना ते पत्रकार म्हणतात की, “देवेंद्र फडणवीसांना मी स्वत: कुठल्या मंत्र्यांनी कुठल्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले, किती नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, कुणाकडे उतरवले याची विस्तृत माहिती दिली. सदर मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी फडणवीसांनी त्यांना क्लीनचिट दिली”, असं गोटे म्हणाले
देवेंद्र फडणवीसांच्या काळातच गृहखात्याची वाट लागली. मनाला येईल त्याप्रमाणे बदल्या करायच्या. पोलीस यंत्रणेचा वापर करुन विरोधकांनाच नव्हे तर ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसे वेठीस धरले होते. अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे माहिती आहे, असेही अनिल गोटे यांनी पत्रात म्हटले आहे.