पुणे | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त अनेकांनी ज्येष्ठांनी आणि वरिष्ठांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अशातच शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या खऱ्या परंतु त्यानंतर ते लगेच सोशल मीडियावर ट्रोल व्हायला सुरुवात झाली.
त्यामुळे सत्यजित तांबे अस्वस्थ झाले होते. ही अस्वस्थता वाढल्यावर सत्यजित तांबे यांनी ट्रोलिंग करणाऱ्या समुदायाला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना केवळ वयाच्या आदरापोटी शुभेच्छा दिल्याचे स्पष्ट करून टाकले.
बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मी समर्थन करीत नाही, कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी मांडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मी समर्थन करतो असे लिहून सत्यजित तांबे यांनी या प्रकरणातून काढता पाय घेतला होता. मात्र त्यांनी दिलेल्या शुभेच्छावरून शिवप्रेमींनी काँग्रेसवर सुद्धा निशाणा साधला होता.