शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय आगामी पुणे महापालिका निवडणुकीत महापौर ठरणार नाही. अशी ताकद शिवसैनिकांनी निर्माण करावी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे या सर्वांचे पुण्याकडे लक्ष आहे. त्यामुळे शिवसैनिक, शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्या माध्यमातून पुण्याला विकासनिधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
तसेच एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांसाठी कामे कशी करावीत याचा आदर्श नाना भानगिरे यांच्याकडून इतरांनी घ्यावा, असे गौरवोद्गारही मंत्री सामंत यांनी काढले. सेलेना पार्क येथील पाण्याच्या टाकीतील पाण्याचे जलपूजन तसेच कै. दत्तोबा उर्फ आप्पा शंकरराव तरवडे पाझर तलाव, मोठया व्यासाची पावसाळी लाईनचे लोकार्पण मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते
.यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे,शहर संजय मोरे, प्रमुख गजानन थरकुटे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, पाणी पुरवठा विभाग मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, बी.जी.कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त प्रसाद काटकर, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, विद्या होडे आदींसह शिवसैनिक व परिसरातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.