सत्ता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट फडणवीसांचे तोंदभरून कौतुक केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राचं वातावरण उत्तम राहावं यासाठी जर ते विरोधी पक्ष नेत्यांना भेट असतील तर त्याचं स्वागत सर्वांनी केलं पाहीजे. त्यातून काही चांगला मार्ग निघत असेल राज्याच्या प्रतिष्ठेसाठी त्याचे स्वागत सर्वांनी केले पाहिजे. माविअचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले.
असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला असता. राज्यसभेच्या निवडणूकीसाठी ज्या प्रकारचे वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे. अधीच राज्याची परिस्थिती बिघडली आहे. आता निवडणूका जवळ येत आहेत तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. करोडो रूपयांच्या गोष्टी मी ऐकतोय… खरेदी करण्यासाठी, कुठून येतो हा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा आहे. पैसा कुठून येतो कुठून जातो. पण, जर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत.
पुढे बोटाना राऊत म्हणाले की, ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. एक मॅच्युअर्ड नेते आहेत. आधीच जे महाराष्ट्राचा राजकीय वातावरण प्रदूषित होतं या निवडणुकीच्या निमित्ताने अधिक बिघडण्याची शक्यता आहे. ते आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून काही त्यातून तोडगा काही राज्याच्या हितासाठी तोडगा काढू शकले तर चांगलं आहे.