मुंबई | दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात (शिवाजी पार्क) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मात्र यावरून मनसेने सेनेवर टीका सुद्धा केली होती तर दुसरीकडे विद्युत रोषणाईची इटलीमधून दिवे मागवण्यात आले होते. आता यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे.
शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटली मधून आयात करण्यात आले आहेत.आता हा योगायोग आहे की इटली च लांगुलचालन? असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत केला आहे. राज्यात शिवसेना पक्षाने काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्यापासून मनसेने सेनेला टार्गेट केले आहे
मुख्यमंत्री निधीतून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. यामध्ये ५ वर्षांचा परिरक्षण खर्चदेखील समाविष्ट आहे. ही रोषणाई कायमस्वरुपी आहे. प्रामुख्याने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा सर्व बाजुंनी विद्युत रोषणाईने उजळावा म्हणून विविध रंग बदलणारे एलईडी प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले आहेत.