बांगलादेशात हिंदूंच्या ६६ घरांची नासधूस करण्यात आली आहे तसेच दुर्गा पूजेदरम्यान मंदिर तोडफोडीच्या घटनांनंतर कथित निंदनीय मीडिया पोस्टवरून बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला. यानंतर भारतातील हिंदू संघटनांनी याचा तीव्र विरोध करत केंद्र सरकारला यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. यातच आता एका भाजप नेत्याने बांगलादेशवर आक्रमण करावे, असे म्हटले आहे.
बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. न्यूयॉर्कमधल्या हिंदू संघटनांनी अमेरिकेतील बांगलादेश दूतावासासमोर निदर्शने केली. तसेच अजूनही अनेक देशांतील बांगलादेश दूतावासासमोर हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी देखील तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही आक्रमक पवित्रा घेत अन्यथा भारताने आक्रमण करावे, असे म्हटले आहे.
स्वामी म्हणाले की, बांगलादेशमध्ये हिंदूंवरील हल्ले थांबले नाहीत, तर भारताने आक्रमण करावे, अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे. दोन-तीन दिवसांपासून बांग्लादेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू वस्त्यांना टार्गेट केले जात आहे.