नवी दिल्ली देशभरात पुन्हा एकदा कॉर्नने आपले हातपाय पसरायला सुरवात केली आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या केंद्राच्या अडचणीत भर घालणारी आहे. त्यातच आता युद्ध पातळीवर संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरवात झालेली आहे. त्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी अधिकृत परदेशी निर्मित कोविड -19 लस भारतात आयात करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
या निर्णयामुळे देशातील लसीबरोबरच आता परदेशी लसच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. ‘सरकारनं विरोधी पक्षांच्या सूचना टीका आहेत असं समजून नाकारू नये ही समृद्ध लोकशाहीची परंपरा आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी परदेशी फार्मा कंपन्यांच्या लसींना मान्यता देण्याचा सल्ला दिला होता.
मात्र राहुलजी गांधी यांच्या या निर्णयाविरोधात भारतीय जनता पक्षाच्या काही मंत्र्यांनी राहुल यांच्यावर टीका केली. पण चार दिवसांनी सरकारने राहुल गांधींचाच सल्ला मानला असे म्हणत संजय निरुपम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.