कोल्हापूर | ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच खरे साखर उद्योगाचे लाभार्थी असल्याचे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. शरद पवारांचे राजकारण हे साखर उद्योगावर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अनेक साखर कारखाने असल्याचे शेट्टी म्हणाले.
हरभरा, केळी, हळद, ऊस, कापूस या पिकात उसापेक्षा जास्त पैसा मिळतो. पण उसात शाश्वत पैसा मिळतो म्हणून शेतकरी ऊस पीक घेतो असेही राजू शेट्टी यांनी यावेळी बोलून दाखविले होते. त्यामुळे शरद पवार व नितीन गडकरी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांविषयी असं बोलणं चुकीचं असल्याचे शेट्टी म्हणाले.
जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करुन दंगली घडतील असे जाणीवपूर्वक वक्तव्य केलं जात आहे. राज्यातील वातावरण खराब करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळं महाराष्ट्र खरच पुरोगामी आहे का? असा प्रश्न पडला असल्याचे शेट्टी म्हणाले. जनतेचे दैनंदिन जीवनातील प्रश्न, रोजगाराचे प्रश्न दुर्लक्षित राहत असतील तर हा पुरोगामी महाराष्ट्र नाही असेच म्हणावे लागेल
आज दिवस दिवस शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, त्यामुळं उभे पिके करपतात, उभा ऊस जळून जातो हे प्रश्न महत्वाचे असल्याचे शेट्टी म्हणाले. तापमान वाढीमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान होतेय, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढीने मशागत खर्च वाढला, गाळप हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतात उभा आहे यावर कुणी बोलायला तयार नसल्याचे शेट्टी म्हणाले.