शरद पवार म्हणाले, “यावर आता काय बोलयाचे, यात काही नवीन नाही. कुठलेही तरी प्रकरण काढून मलिकांना अडवले जाण्याचा प्रयत्न होणार, याची मला खात्री होती. आज ना उद्या हे घडेल, काही तरी प्रकरण काढून मलिकांना असा त्रास दिला जाईल यांची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे याप्रकरणी अधिक भाष्य करायची गरज वाटत नाही. साधा कार्यकर्ता असेल की दाऊचे नाव घ्यायचे आणि अडकवायचे प्रकार सुरू आहेत. तुम्हाला कदाचित माहिती असेल, तेव्हा तुम्ही लहान असाल, त्याकाळी माझ्यावरही असाच आरोप झाला होता. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. आता याला २५ एक वर्ष झाली असेल. अशी नावे घेऊन लोकांना बदनाम करणे, त्यांना त्रास देणे.”
गेल्या आठवड्यात ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी दाऊतची बहिण हसिना पारकर आणि भाऊ इक्बाल कासकर यांच्या कुटुंबियांच्या मुंबईतील घरीत छापेमारी करून चौकशी केली होती. इक्बाल कासकरांची चौकशी केल्यानंतर मलिकांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर ईडीने आज (२३ फेब्रुवारी) पहाटे ४. ३० वाजता त्यांच्या घरी पोहोचले आणि यानंतर त्यांना सकाळी ७ वाजता ईडीच्या कार्यलयता घेऊन गेले तर ७.४५ वाजल्यापासून चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले.