नाशिक | नाशिक महानगर पालिका निवडणुकीला अवघेंकही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून फोडाफोडीच्या राजकाणाला ऊत आला आहे. अशातच आता लगाव पाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा शिवसेना पक्षाने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपच्या उपमहापौरांसह चार नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. नाशिक महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. यामध्ये विद्यमान उपमहापौर भिकुबाई बागुल यांचाही समावेश आहे.
हे सर्व नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून आपल्या हाती शिवबंधन बांधणार आहेत. सायंकाळी मातोश्रीवर या सर्व नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. भाजपच्या या नगरसेवकांच्या हाती शिवबंधन उपमहापौर भिकुबाई बागुल माजी उपमहापौर प्रथमेश गीते हेमलता कांडेकर सुफी जीन मुशीर सय्यद प्रथमेश गीते हे माजी उपमहापौर आहेत. प्रथमेश गीते हे वसंत गीते यांचे पुत्र आहेत.
वसंत गीते हे शिवसेनेत आहेत मात्र, त्यांचे पुत्र प्रथमेश गीते हे भाजपचे नगरसेवक आहेत. पण आता प्रथमश गीते हे भाजपला रामराम करत शिवबंधन आपल्या हाती बांधणार आहेत. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. येत्या काळात भाजप आणि मनसेचे विद्यमान नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.